किन्नोर – हिमाचल प्रदेशमधील किन्नोर जिल्ह्यात झालेल्या भुस्खलनामुळे नऊ जण ठार झाले. तर तिघे जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किन्नौर जिल्ह्यातील बटसेरी जवळ डोंगराचा भाग कोसळल्याने छितकूल येथून सांगला येथे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीवर दरड कोसळली.
दरड कोसळल्यामुळे ९ जणांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी आहेत. गाडीतील पर्यटक दिल्ली आणि चंदीगड होते. ते हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी गेले होते.
काँग्रेस आमदार जगत सिंह नेगी यांनी म्हटलं की, डोंगरावर सातत्याने दगड पडत आहेत. यामुळे बचाव कार्यात अडचण येत आहे. तसेच, जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी सरकारकडे हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. ते लवकरच पोहोचेल, असे आश्वासन मिळाले आहे.
दरम्यान या भूस्खलनामुळे बास्पा नदीवर तयार करण्यात आलेला कोरोडो पूलही तुटला आहे. यामुळे अनेक गावाचा संपर्कही तुटला आहे.