पिंपरी – दिवाळीचा सण प्रकाशाचा सण. या सणाला फराळ जसा महत्वाचा तसाच फटाकेही महत्वाचे आहेत. दिवाळीच्या सणाचा आनंद फटाक्यांशिवाय शक्यच नाही. यंदाच्या दिवाळीत कमी आवाजाच्या फटाक्यांना जास्त मागणी असून फॅन्सी फटाक्यांची क्रेझ आहे. गत वर्षीच्या तुलनेत या वर्षी फटाक्यांच्या किमतीमध्ये 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात काही जागा या फटाक्यांच्या स्टॉलसाठी राखून ठेवलेल्या असतात. शहरात असे ठिकठिकाणी स्टॉल मागील आठवड्यापासून उभारण्यात आले असून फटाक्यांची विक्री सुरू झाली आहे. फटाके विशेषतः लहान मुलांमध्ये फटाक्यांचे जास्त आकर्षण असते. तसेच सध्या परीक्षा संपून दिवाळीची सुटी लागल्याने लहान मुलांसह फटाक्यांची खरेदी करताना पालक दिसत आहेत. त्यातच फॅन्सी फटाके, फ्लॅश लाइट, फुलबाजा, भुईचक्र, क्रॅकर्स, पाऊस यांना मोठी मागणी आहेत. मोठ्यांसाठी फटाक्यांच्या माळा व सुतळी बॉम्ब तर, लहान मुलांसाठी आपटबार, सुरसुरी यांना मागणी आहे. गत वर्षी फटाक्यांच्या किमतीमध्ये 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तरी कमी आवाजांच्या फटाक्यांना जास्त मागणी आहे.
दरवाढ होऊनही मागणी
गतवर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या दरामध्ये 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. तरीही मागणी टिकून आहे. लहान मुले प्रामुख्याने फॅन्सी फटाके, फुलबाजा, पाऊस, आपटबार तसेच कमी आवाजांच्या फटाक्यांना मागणी आहे.
वर्षभरातील वायू, ध्वनी प्रदूषण दिवाळीत
वर्षभरातील प्रदूषण प्रामुख्याने दिवाळीमध्ये होते. त्यात प्रामुख्याने लक्ष्मी पूजनाला वाजविले जाणारे फटाक्यांचा जास्त समावेश असतो. या दिवशी मोठ्या प्रमाणात आताषवाजी होते. त्यातून आवाज आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होते. यंदा ऑक्टोबरच्या शेवटीच मोठ्या प्रमाणात शहरात प्रदूषण वाढल्याची नोंद झाली आहे. ते कमी करण्यासाठी दिवाळीत खबरदारी घेण्याची आवश्यकता असून शोभेच्या फटाक्यांचा वापर करून दिवाळी साजरी करण्याची गरज असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.