कोपरगाव – न्यायालयात चालु असलेल्या खटल्यात वादी-प्रतिवादी किंवा फिर्यादी व आरोपीच्या वकीलाशिवाय न्यायाधीश न्यायदान करू शकत नाही तर वकीलांच्या मदतीने न्याय देता येतो, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कोऱ्हाळे यांनी केले.
कोपरगाव वकील संघातर्फे आयोजित नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. एम. पी. येवले यांच्या पदग्रहण कार्यक्रमात न्या. कोऱ्हाळे बोलत होते. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. एस. बोस, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एम. ए. शिलार, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर बी.डी. पंडीत, माजी अध्यक्ष ऍड. एस. पी. खामकर, अध्यक्ष ऍड. एम.पी. येवले, उपाध्यक्ष ऍड. एस. डी. गव्हाणे, महिला उपाध्यक्ष ऍड. ज्योती भुसे, सचिव ऍड. दिपक पवार उपस्थित होते.
न्या. कोऱ्हाळे पुढे म्हणाले की, खटल्यामध्ये वकीलांकडून खरी माहीती, पुरावे न्यायाधीशांपर्यंत पोहचले तरच न्याय होतो. न्याय संस्थेवरील नागरीकांचा विश्वास दृढ होण्यासाठी न्यायाधीश व वकीलांनी काम करणे गरजेचे आहे. परंतु प्रलंबित खटले आणि न्यायाधीशांची संख्या पाहता वेळेत न्याय होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ऍड. एस. पी. खामकर यांनी त्यांच्या काळात योग्य कामकाज केले. ऍड. एम.पी. येवले यांना काम करण्यासाठी भरपुर संधी आहे.
नवीन न्यायालय इमारत चांगली कशी होईल, याकडे नुतन अध्यक्षांनी लक्ष घालुन पुर्ण करून घ्यावी. न्या. बी. एम. पाटील म्हणाले, वकीलसंघ कसा असतो. हे मला कोपरगावच्या वकील संघामध्ये आल्यावर कळाले. ज्युनिअर वकीलांना न्यायालयात कामकाजाची जलदगतीने माहिती व्हावी, त्यांच्यात स्टेज डेअरींग निर्माण होण्यासाठी वकील संघात लेक्चर सेरिज सुरू करण्याची विनंती करून नुतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रास्ताविक ऍड. एस.पी. खामकर यांनी केले. सत्काराला उत्तर देतांना नुतन अध्यक्ष ऍड. येवले म्हणाले की, कोपरगावच्या वैभवशाली वकील संघाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली हे मी माझे भाग्य समजतो. न्यायदेवतेचे मतपरिवर्तन करणारा म्हणजे वकील तेव्हा बार आणि बेंचचे संबध कसे सलोख्याचे राहतील. यासाठी वकील संघाच्या सदस्यांना विश्वासात घेवुन काम करेल. मिळालेल्या पदाला योग्य न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी न्या. एम.ए. शिलार, ऍड. व्ही. जी. सदाफळ, ऍड. पी. एम. गुजराथी, ऍड. अशोक टुपके, ऍड. जयंत जोशी, ऍड. एस. एम. वाघ, ऍड. एस. डी. कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ आर. टी. भवर, ऍड. सी. एम. वाबळे, ऍड. एस. व्ही. देव, ऍड. भास्कर गंगावणे, ऍड. शंतनु धोर्डे, यांच्यासह अनेक सिनिअर, ज्युनिअर वकील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऍड. राणजित जावळे, ऍड. राहुल जावळे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन ऍड. महेश भिडे यांनी केले.उपाध्यक्ष ऍड. एस.डी. गव्हाणे यांनी आभार मानले.