शेवगाव – तालुक्यातील वरूर येथील इयत्ता सहावीची सोफिया जावेद शेख हिचा शाळेतून घरी येताना गंभीर अपघात झाला होता. या गंभीर अपघातामुळे तिला शारीरिक दुखापत झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून तिच्यावर नगरच्या साई एशियन हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. या उपचारादरम्यान दोन मोठ्या शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने उपचारासाठी येणारा खर्च हा या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा होता.
सय्यद कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी कक्षातून मिळालेल्या भरीव मदतीमुळे या विद्यार्थिनीवर उपचार होऊ शकले.अर्थसाह्यासाठी मुख्यमंत्री कक्षाचे ओएसडी आरोग्यदूत मंगेश चिवटे व आ. मोनिका राजळे, प्राजक्त झावरे पाटील, समाजभान टीमचे प्रमुख दादा थेटे, इमामभाई पठाण, प्रवीण कोठुळे, वैभव पुरनाळे, बापूसाहेब भुजबळ, दत्तात्रय शिंदे, अन्सार शेख, सचिन म्हस्के आदींचे योगदान लाभले.