चिंबळी- केळगाव (ता. खेड) येथील प्राथमिक उपकेंद्राला आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखी यांनी भेट देऊन विविध आजारांविषयी सर्व्हे कशा पद्धतीने करावयाचा तसेच आरोग्य सेविकांना करोना व्हायरस संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कायकाय उपाययोजना करता येथील याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. तसेच केळगाव येथील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांना सॅनिटायझर माक्स देण्यात आले.
दरम्यान, शेलपिपंळगाव (ता. खेड) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत केळगाव येथील प्राथमिक उपकेंद्राच्या वतीने हनुमानवाडी, ठाकरवस्ती, गावठाण हद्दीत विविध ठिकाणी जाऊन जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या अंतर्गत आरोग्य, अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक घरोघरी जाऊन कुटुंबाची संपुर्ण माहिती घेऊन सर्व्हे करीत आहेत. तर सर्दी, खोकला, ताप या विषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.