केडगाव – येथील धुमळीचा मळा या ठिकाणी जागेच्या जुन्या वादातून बेकायदा जमाव जमवून दोन गटात हाणामारी झाली, याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दाखल केल्याने पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही गटातील 17 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सुनील बाळासाहेब गायकवाड यांनी शनिवारी (दि. 25) दिलेल्या फिर्यादीवरून एकनाथ विश्वनाथ गायकवाड, अमोल एकनाथ गायकवाड, पंढरीनाथ विश्वनाथ गायकवाड, नवनाथ पंढरीनाथ गायकवाड, विजय विश्वनाथ गायकवाड, रोहित विजय गायकवाड, मयूर विजय गायकवाड, अक्षय राऊत आणि तेजस्विनी नवनाथ गायकवाड (सर्व रा. धुमळीचा मळा, केडगाव, ता. दौंड) या नऊ जणांवर गुन्हा दाखल केला होता तर याच मारहाण प्रकरणी नवनाथ पंढरीनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील बाळासाहेब गायकवाड, शरद बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब तुकाराम गायकवाड, अलका बाळासाहेब गायकवाड, अर्चना सुनील गायकवाड, पूजा शरद गायकवाड, तुकाराम मारुती गायकवाड आणि इंदूबाई तुकाराम गायकवाड (सर्व रा. धुमळीचामळा, केडगाव, ता. दौंड) या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय कापरे हे करीत आहेत.