रांजणगाव पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा, दाघांना अटक
शिरूर (पुणे)- करोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये व यासाठी जिल्हाधिकारी दिलेल्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई करीत असणाऱ्या पोलीस पथकावर तुमचा पावत्या फाडायचा काय संबंध? असे म्हणून पोलिसांवर हल्ला करून मारहाण करून शिवीगाळ दमदाटी, शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी तिघांवर रांजणगाव औद्योगिक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.
प्रवीण साहेबराव भोगावडे (वय 29), बाळासाहेव विठ्ठल भोगावडे, सत्यवान दिलीप भोगावडे (वय 24 वर्षे, तिघे रा. गणेगाव खालसा, ता. शिरूर)अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नाव आहेत. पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली.
गणेगाव खालसा गावच्या हद्दीत नियम न पाळणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे शासकीय कर्तव्य बजावत असताना यातील आरोपी यांनी संगनमताने तुम्ही गरीब लोकांना लुटत आहे. तुमचा काय संबंध पावत्या पाडायचा? असे म्हणून अंगावर धावून येऊन हाताने पोलिसांना मारहाण केली. तिघांपैकी दोघाजणांना अटक केली आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पी. पी. कदम करीत आहेत.