मुंबई – कंगना रणौत प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चाललं आहे. काल मुंबई महापालिकेने तिच्या कार्यालयावर कारवाईचा बडगा उचलल्यानंतर कंगना अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. कंगना व शिवसेनेदरम्यान रंगलेल्या या वादात अनेक भाजप नेत्यांनी उडी घेतली असून महाराष्ट्र सरकारवर सडकून टीका केली आहे. अशातच आज भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रिपाईचे (अ) अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगनाच्या मुंबई येथील निवासस्थानी तिची भेट घेतली.
यापूर्वी देखील आठवले यांनी कंगनाचे मुंबईबाबतचे वक्तव्य चुकिचे असले तरी तिला मुंबईमध्ये येऊ देणार नाही ही भूमिका अयोग्य असल्याचे म्हंटले होते. तसेच कंगनाच्या सुरक्षेसाठी रिपाईचे कार्यकर्ते सज्ज असल्याचं सांगत तिला आपला पाठिंबा असल्याचंही दर्शवला होता.
दरम्यान, कंगनाची भेट घेतल्याचा एक व्हिडीओ मंत्री रामदास आठवले यांनी ट्विट केला आहे. या व्हिडिओसोबतच त्यांनी भेटीदरम्यान झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला आहे.
भेटीदरम्यान कंगनाने, “महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधनावर माझी पूर्ण श्रद्धा विश्वास असल्याचे आज अभिनेत्री कंगना राणावत यांनी मला सांगितले. त्यांना रिपाइं चा पाठिंबा मिळाल्याबद्दल धन्यवाद मानले.” अशी माहिती आठवले यांनी ट्विट केली आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधनावर माझी पूर्ण श्रद्धा विश्वास असल्याचे आज अभिनेत्री कंगना राणावत यांनी मला सांगितले. त्यांना रिपाइं चा पाठिंबा मिळाल्याबद्दल धन्यवाद मानले. pic.twitter.com/1j89e9egEB
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 10, 2020