मुंबई – भाजपसोबत आम्ही 25 वर्ष सत्तेत होतो. त्यांच्यासोबत एक भावनिक आणि जिव्हाळ्याचे नाते होते. एका विचाराने दोन्ही पक्ष एकत्र होते. 25 वर्षांच्या संसार मोडून दुसऱ्या पक्षासोबत जायचे म्हटल्यावर दु:ख तर होणारच आहे’, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, स्टॅंड अप कॉमेडिअन कुणाल कामरा हा नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहतो. यावेळी तो पुन्हा त्याच्या ट्विटमुळे चर्चेत आला आहे. कुणाल लवकरच ‘शटअप या कुणाल – २ ’ कार्यक्रमाचा दुसरा सिझन सुरु झाला आहे. यातच कुणालने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ‘शटअप या कुणाल’ शोमध्ये आमंत्रित केलं आहे. या खास मुलाखतीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं