मुंबई – एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेचे विलीनीकरण होण्याची घोषणा झाल्यानंतर आज या दोन्ही कंपन्यांच्या शेअरच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 14.04 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
त्यामुळे आता ही कंपनी टीसीएस कंपनीपेक्षा मोठी होणार आहे. टिसीएस कंपनीचे बाजार मूल्य आज 13.79 लाख कोटी रुपये इतके होते. एचडीएफसी कंपनीच्या शेअरचा भाव दिवसाअखेर 9.30 टक्क्यांनी वाढला.
एक वेळ या शेअरचा भाव 16.41 टक्क्यापर्यंत वाढला होता. अनपेक्षितपणे सकाळी विलीनीकरणाची घोषणा झाली. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांच्या शेअरच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आणि क्षेअरचा गाव वाढत गेला.