पाटणा – पाटणा शहरातील सुमारे शंभर वर्ष जुना असलेला सुलतान पॅलेस पाडून त्या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. तथापि पाटण्याच्या मध्यवस्तीत असेला हा प्राचीन महाल पाडण्यास वारसा प्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांना आता पाटणा हायकोर्टानेही दिलासा दिला असून हा सुलतान पॅलेस पाडण्यास कोर्टाने स्थगिती दिली आहे.
या निर्णयामुळे बिहार आणि पश्चिम बंगालच्या अनेक वारसा वास्तु प्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. हा राजवाडा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असून तो पाडून टाकण्याऐवजी त्याची दुरूस्ती करून तेथे पंचतारांकित हॉटेल उभे केले जाऊ शकते असे अनेकांचे म्हणणे आहे त्यांनी जनहित याचिकेद्वारे राजवाडा पाडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान दिले होते. या जनहित याचिकेतील याचिकाकर्त्यांच्या भावना लक्षात घेत हायकोर्टाने राजवाडा पाडण्यास स्थगिती दिली आहे.