बॉलिवूड अभिनेत्री ‘राधिका आपटे’चा आज वाढदिवस आहे. राधिकाने चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्मण केले आहे. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू आणि मल्याळम अशा अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये राधिकाने काम केलं आहे. त्यामुळे दिग्ज कलाकार म्हणून राधिका आपटेची ओळख आहे.
राधिका आपटेचा जन्म 7 सप्टेंबर 1985 साली तामिळनाडूमधील वेल्लोर येथे झाला होता. आणि त्यानंतर राधिकाचे सर्व कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. तीने आपले सुरुवातीचे शिक्षण पुण्यात घेतले नंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून राधिकाने अर्थशास्त्र आणि गणित विषयात पदवी घेतली. राधिकाचे वडील डॉ. चारूदत्त आपटे पुण्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत.
सोशल मीडियावर राधिका प्रत्येक मुद्यावर आपलं मत व्यक्त करत असते. त्यामुळे बऱ्याचदा ती ट्रोलही होते. बेनेडिक्ट टेलर या संगीतकार सोबत 2012 साली राधिका विवाह बंधनात अडकली.
Thank you @SanjanaBatra!! #deepveerwedding benedict- Outfit : @sshomme @arrow_1851 @marksandspencerindia
Tie : @thebrocode.in me- Outfit : @sunainakhera
Necklace and rings : @gehnajewellers1
Earrings : @diosajewels
Clutch : @judithleiberny pic.twitter.com/hgcLg3IPNL— Radhika Apte (@radhika_apte) December 14, 2018