वाघोली – हिंगणगाव तालुका हवेली येथील ग्रामपंचायत कर्मचारी अमोल वेताळ यांना गेल्या तीन महिन्यापासून वेतन व प्रवास भत्ता देण्याबाबत आदेश गटविकास अधिकारी हवेली यांनी देऊन देखील ग्रामपंचायतीच्या वतीने अद्याप पगार न दिल्याने कर्मचारी वर्गात याबाबत नाराजी पसरली आहे.
हिंगणगाव तालुका हवेली येथील ग्रामपंचायत कर्मचारी अमोल उत्तम वेताळ याला दि. 11 ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालयाकडील कामकाज करण्यासाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली यांनी उपस्थित राहण्याबाबत आदेश दिला होता. त्यानुसार ग्रामपंचायत कर्मचारी अमोल वेताळ ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर तीन महिन्याच्या कालावधीत पंचायत समिती हवेली येथे कामकाज करत आहे.
या कालावधीतील पगार व प्रवास भत्ता सदर कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी देण्यात यावा असा आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली यांनी सरपंच, ग्रामसेवक हिंगणगाव यांना दि. २२ ऑक्टोबर रोजी दिला आहे. सदर कर्मचारी ला गेल्या तीन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने कर्मचारी वर्गात ग्रामपंचायतीच्या बद्दल तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
याबाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सुवर्णा लोंढे यांनी याबाबत सांगितले अमोल वेताळ यांना पगार देण्याबाबत गटविकास अधिकारी यांनी आदेश दिला आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यकारी मंडळाच्या मान्यतेने ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत अमोल वेताळ यांच्या पगाराबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.