#RanjiTrophy : नाणेफेक जिंकून हरियाणाचा फलंदाजीचा निर्णय

रोहतक : सईद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा महाराष्ट्राचा संघ रणजी करंडक स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्र संघाची आजपासून हरियाणा विरूध्द #HARvMAH रोहतक येथील लोहिली मैदानावर लढत सुरू झाली आहे.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा हरियाणा संघाच्या बाजूने लागला असून हरियाणाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व नौशाद शेखकडे सोपवण्यात आले असून, तो प्रथमच महाराष्ट्राच्या रणजी संघाची धुरा सांभाळणार आहे.

सध्या हरियाणाचा संघ फलंदाजी करत असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा हरियाणा संघाच्या ७.३ षटकात २ बाद २४ धावा झाल्या आहेत. अंकित कुमार १४ तर चैतन्य बिश्नोई १ धावांवर माघारी परतले आहेत. महाराष्ट्रकडून अनुपम संकलेचा आणि समद फल्ला यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला आहे.

महाराष्ट्र संघ :

हरियाणा संघ :

दरम्यान, यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेस आजपासून सुरूवात होत आहे. यात ३८ संघ सहभागी झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.