…म्हणून सोनिया गांधी वाढदिवस साजरा करणार नाहीत

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस. आज त्या 73 वर्षांच्या झाल्या. पण यंदा त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील विविध भागात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. या सर्व घटनांनी दु:खी होत, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहे. या घटनांमुळे कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी खूप दुःखी झाल्या आहेत. परिणामी त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्नाव बलात्कार पीडितेची जाळून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दिल्लीच्या रुग्णालयात पीडितेचे निधन झाले. या घटनेने दुःखी झाल्यानंतर सोनिया गांधींनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. त्याआधी हैदराबादमध्ये महिला डॉक्‍टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या करण्यात आली होती. दरम्यान उन्नावमध्ये बलात्कार पीडितेला जिवंत जाळल्याप्रकरणी कॉंग्रेसने उन्नाव आणि लखनऊमध्ये निदर्शने देखील केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.