नवी दिल्ली – हरियाणात होणा-या विधानसभा निवडणूकीत भाजप 75हून अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी व्यक्त केला आहे. हरियाणा विधानसभेची एकूण 90 सदस्य संख्या आहे.
नवी दिल्ली येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खट्टर म्हणाले, हरियाणमध्ये वर्षाअखेर निवडणूका होणार आहे. या निवडणूकीत भाजपकडून 75हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. राज्यातील गेल्या काही निवडणूकीत भाजपने घवघवीत यश मिळविलेले आहे. या निवडणूकीतही सर्वाधिक जागा जिंकण्याचे उद्ष्÷िष्÷ष्ट आम्ही साध्य करू, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूकीत विरोधी पक्षाला दारूण पराभव पत्कारावा लागल्याने ते निष्क्रिय झालेले आहेत. तसेच राज्यात भाजप सरकारने केलेल्या विकासामुळेच जनतेने आम्हाला संसदेत एक हाती सत्ता दिली आहे. आगामी विधानसभा निवडणूकीतही जनता आम्हालाच कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निवडणूकीत पंतप्रधान मोदी यांना प्रचारासाठी बोलविण्यात येईल का असा प्रश्न केला असता खट्टर म्हणाले, पक्षाचा प्रचार करण्यासाठी आम्ही पंतप्रधानांना विनंती करणार आहे. तसेच राज्यातील 20 हजार मतदान केंद्रावर भाजपचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. निवडणूक काळात त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे खट्टर म्हणाले.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत हरियाणातील 10 पैकी 10 जागा जिंकत भाजपने घवघवीत यश मिळालेले आहे. तसेच सध्या राज्यातील 90 पैकी 47 आमदार हे भाजपचे आहेत.