Haryana Cm Manoharlal Khattar Resigns । हरियाणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी संपूर्ण मंत्रिमंडळासह आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर लाल खट्टर आज दुपारी ४ वाजता संपूर्ण मंत्रिमंडळासह नव्याने शपथ घेणार आहेत. खट्टर सरकारमध्ये मंत्री असलेले कंवर पाल गुर्जर म्हणाले की, ‘मनोहर लाल खट्टर हेच मुख्यमंत्री राहतील. त्याआधी आज दुपारी १२ ते १ च्या दरम्यान विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. अर्जुन मुंडा आणि तरुण चुघ हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सरकारचा शपथविधी आज दुपारी एक वाजता होणार आहे. त्याआधी आज दुपारी १२ ते १ च्या दरम्यान विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. अर्जुन मुंडा आणि तरुण चुघ हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. सूत्रांच्या हवाल्याने मनोहर लाल खट्टर हेच मुख्यमंत्री राहतील असे वृत्त आहे. तसेच दोन उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या समाजातून केले जाऊ शकतात. हरियाणात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुका घेण्याचा विचार केला जात आहे.
Haryana Cm Manoharlal Khattar Resigns । हरियाणा विधानसभेचे गणित
-90 सदस्यांच्या हरियाणा विधानसभेत बहुमताचा आकडा – 46
-भाजप – 41
-भाजपसह अपक्ष – 6
-हरियाणा लोकहित पार्टी – 1 (गोपाल कांडा)
-जेजेपीपासून वेगळे झाल्यानंतर भाजपला पाठिंबा – 48
-JJP-10
-अपक्ष-1 (बलराज कुंडू)
-इंडियन नॅशनल लोकदल – १ (अभय चौटाला)
-काँग्रेस – 30
Haryana Cm Manoharlal Khattar Resigns । भाजप आणि जेजेपीमधील मतभेदाची प्रमुख कारणे
-जेजेपी लोकसभेच्या 1-2 जागांची मागणी करत आहे
-हिस्सार, भिवानी-महेंद्रगड जागेची मागणी
-भाजप एकही जागा द्यायला तयार नाही
-गेल्या वेळी सर्व 10 जागा भाजपने जिंकल्या होत्या
-राज्य भाजप आघाडीच्या बाजूने नाही
-हरियाणात जेजेपीचे 10 आमदार
-जेजेपीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहे.
हे वाचाल का ? हरियाणातही ‘खेला होबे’ ! जागा वाटपावरून भाजप-जेजेपी युती तुटण्याच्या मार्गावर?; दुष्यंत चौटालांशिवाय नवीन सरकार स्थापन होणार