पिंपरी, (प्रतिनिधी) – कष्टकरी संघर्ष महासंघ व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने शुक्रवारी (दि.1) विविध मागण्यांकरिता मुंबईतील आझाद मैदाम येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिली आहे. सर्व कामगारांनी सकाळी 11 वाजता मैदानात उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
फेरीवाला,घरेलू कामगार,रिक्षा चालक, कंत्राटी कामगार, शेतमजूर, कंत्राटी कामगार,सफाई कामगार यांचे साठी त्वरित महामंडळाची स्थापना करून त्यांना लाभ द्यावा. सर्व कष्टकरी कामगारांना म्हातारपणी पेन्शन लागू करावी. सर्व कष्टकरी कामगारांना ईएसआयसी योजना लागू करा. सर्व कामगारांना स्वस्तातील घरकुलाची निर्मिती करावी. या प्रलंबित मागण्यांकरिता या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.