बॉलिवूडचे शहंशाह, बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे आज 11 ऑक्टोबर रोजी आपला 77वा वाढदिवस साजरी करत आहेत. यानिमित्त बीग बी यांच्याकडे बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अनेक बॉलिवूड सिलेब्रिटीजने सोशल मीडियावर अमिताभ यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
पण सोशल मीडियावर यापूर्वीच #HappyBirthdayAmitabhBachchan ट्रेंड सुरू करण्यात आला आहे. याचवेळी अनुपम खेर, शत्रुघ्न सिन्हा, माधुरी दीक्षित, फरहान अख्तर, अजय देवगण, नेहा धूपिया, परिणीति चोप्रा यासारख्या दिग्गज कलाकारांनीही अभिनयाचे महामेरू आणि महानायकाचे खास अंदाजात अभिनंदन केले आहे.
दरम्यान, यावेळी अमिताभ बच्चन यांनी आपला वाढदिवस साजरी करणार नसल्याचे सांगितले होते. यानिमित्त ते पॉजिटिव्ह फील करत आराम करू इच्छित आहेत. दरम्यान, आपल्या वाढदिवसाची पार्टी ते दिवाळीत देणार असल्याची चर्चा रंगत आहे.