‘पतियाळा बेब्स’मध्ये हनुमान सिंह आणि बबिता यांचे दुसरे लग्न

“पतियाळा बेब्स’मध्ये सध्या हनुमान सिंह आणि बबिता यांच्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू आहे. बबिताची पहिल्या लग्नाची मुलगी मिनी या लग्नासाठी फार उत्साही आहे. तिनेच आपल्या आईचा दुसरा विवाह जुळवून आणला आहे. बबिता आणि मिनी यांच्यातले नाते आई- मुलगी असे असण्यापेक्षा जीवलग मैत्रिणींचे नाते आहे. एक मुलगी आपल्या आईच्या ईच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असते, असा या सिरियलचा सध्याचा ट्रॅक आहे. ह

नुमान सिंह हा अत्यंत हट्टी असतो. तो अन्य कोणाचेही काहीही ऐकत नाही. मात्र मिनीसमोर त्याचे काहीही चालत नाही. भविष्यात याच मिनी आणि हनुमान सिंह यांच्यातील नाते वेगळे वळण घेणार आहे. पण त्यासाठी लग्नाचा सोपस्कार पार पडणे आवश्‍यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.