भोर- भोर शहरातील दिव्यांग व्यक्तींना 5 टक्के राषीव निधीमधून निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय भोर नगरपालिकेने घेतला असल्याची माहिती भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली. करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भोर नगरपरिषदेने शहरातील 122 दिव्यांग बांधवांना निर्वाहभत्ता म्हणून प्रत्येकी 4 हजार रुपये अशी एकूण 4 लाख 28 हजारांची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली असल्याचे मुख्याधिकारी थोरात यांनी सांगितले.
या विषयाच्या अनुषंगाने भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष गणेश पवार, गटनेते तथा माजी नगराध्यक्ष सचिन हर्णसकर आणि नगरसेवकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी या वेळी स्पष्ट केले. दिव्यांग लाभधारकांस या कामी काही अडचण उद्भवल्यास 02113222570 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.