अभिनेत्री वाणी कपूर ही सध्या सोफी चौधरीच्या “वर्क इट अप या शोमध्ये सहभागी झाली आहे. हा कार्यक्रम फिटनेसवर आधारित आहे. सोफीने वाणीसोबत चित्रीत झालेले शोचे प्रोमोज आपल्या इन्स्टाग्राम अकौंटवर शेअर केले आहेत. यानिमित्ताने बातचीत करताना वाणी सांगते की, एक्सरसाईज हा तिच्या जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग आहे. व्यायामामुळेच आज ती इतकी एनर्जेटिक आणि ऍक्टिव दिसत आहे.
वाणी न चुकता व्यायाम करणाऱ्यांपैकी एक आहे. या शोचा हेतूदेखील लोकांना व्यायामासाठी प्रेरित करणे हाच आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून बॉलीवूडमधील अनेक सेलीब्रेटींचे फिटनेस फंडे शेअर केले जात आहेत.
200 दशलक्ष लोकांपर्यंत हा शो पोहोचतो असे सांगितले जाते. या शोसाठी वाणी आणि सोफी या दोघीही चांगलीच मेहनत घेताना दिसत आहेत. मॉर्निंग वॉक, केबल रोप ओव्हरहेड ट्राइसेप्स, लंजेज यांसारख्या एक्सरसाईजच्या माध्यमातून प्रेक्षकांना अधिकाधिक आकर्षित करण्याचा दोघींचा प्रयत्न आहे.