मुंबई – अभिनेता सोनू सूद जितका आपल्या अभिनयासाठी ओळखला जातो तितकाच तो सोशल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. म्हणूनच अनेकजण सोनूला बॉलिवूडमधील खरा हिरो मानतात. सोनू सूदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्यामध्ये सोनू एका टपरीवाल्याला पार्टनरशिप मागताना दिसतोय.
रात्रीच्या वेळेत सोनू सूद रस्त्यावरील एका चहाच्या स्टॉलवर पोहचलेला दिसतो. यावेळी चहावाला देखील त्याला पाहून आश्चर्य व्यक्त करतो. सोनू त्याला विचारतो काय बनवतोय ? त्यावर तो म्हणतो कॉफी बनवतोय. इतक्या रात्री मोठ्या अभिनेत्याला आपल्या छोट्या दुकानात आलेलं पाहून दुकानातील इतर सहकारी देखील शॉक होऊन जातात. सोनू सूद दुकानाच्या पार्टनरशिपबाबत जैवेळी त्या दुकानदाराशी बोलतो त्यावेळी तो मुलगा चांगला खुश होताना दिसतो. इतक्यात बाजूला उभ्या असलेल्या एकाच्या तोंडात गुटखा पाहून सोनू त्याला गुटखा थुंकण्यासाठी सांगतो.
View this post on Instagram
अभिनेत्याने गुटखा थुंकायला लावताच ती व्यक्ती तेथून जाऊन गुटखा थुंकताना दिसते. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. चंद्रपूरवरून नागपूर प्रवासादरम्यान सोनू सूदसोबत हा सर्व प्रकार घडल्याचे समजते. चार लाखांहून अधिक जणांनी तो व्हिडीओ पहिला असून अनेकांनी पुन्हा एकदा सोनू सुदचे कौतुक केले आहे.