येरवडा (प्रतिनिधी) : यशवंनगर भोसले वस्ती या भागांमध्ये दीडशे कुटुंबीयांना भीमलहुजी महासंग्राम सामाजिक विकास संघटना व श्री गुरुकृपा सेवा फाउंडेशन यांच्यावतीने घरेलू कामगार ,भंगार वेचक व गोरगरीब कुटुंबांना संघटनेच्यावतीने 15 दिवस पुरेल एवढे धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद वैरागर गुरुकृपा सेवा फाऊंडेशनचे संतोक सिंग,भीम लहुजी महासंग्राम संघटनेचे संपर्कप्रमुख प्रताप भाऊ मोहिते, विनोद माळवतकर ,शेखर कुलकर्णी, भरत वैरागर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते