मुंबई – आज IPL 2022 च्या 35 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) चा सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सोबत होणार आहे. सहा सामन्यांत पाच विजयांसह गुजरातचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. कोलकाताने आतापर्यंत सातपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि चार गमावले आहेत. हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.
गुजरातने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार हार्दिक पंड्या संघात परतला आहे. विजय शंकरला संघातून वगळण्यात आले आहे.
Toss Update 🚨@gujarat_titans have won the toss and elect to bat first.
Follow the match ▶️ https://t.co/GO9KvGCXfW#TATAIPL | #KKRvGT pic.twitter.com/ehxJfeLVgf
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
कोलकाताच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. सॅम बिलिंग्ज, टीम साऊदी आणि रिंकू सिंग यांचे संघात पुनरागमन झाले आहे. आयपीएल 2022 मध्ये ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखाद्या संघाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलग तीन पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सने अनेक मोठे बदल केले आहेत. सलामीवीर आरोन फिंच, यष्टिरक्षक शेल्डन जॅक्सन आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यांना संघातून वगळण्यात आले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग-11 :-
व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (विकेटकीपर), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.
गुजरात टायटन्स प्लेइंग-11 :-
रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, लोकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.