देशात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. रस्ते अपघातामध्ये देशभरात अनेकांचा बळी जात असून ही गंभीर बाब आहे. असाच एक भयानक अपघात गुजरातमध्ये घडला आहे. एका भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चिरडले आहे. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुजरातच्या गोंडलमध्ये घडला आहे. दरम्यान अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
सुसाट कारची दुचाकीस्वाराला धडक, जागीच मृत्यू #accident pic.twitter.com/V629ot4kpL
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) April 23, 2022
गुजरातमधील गोंडलमध्ये घडलेल्या या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पोलीसांनी या अपघाताचा तपास सुरु केला आहे. सीसीटीव्हीमध्ये भरधाव येणारी कार समोरून येणाऱ्या दुचाकस्वाराला चिरडून समोर असलेल्या एका दुकानाला धडकली आहे. या व्हिडिओवरून हा अपघात किती भयानक आहे याची कल्पना येत आहे.