भूमी पेडणेकरने दिल्या गुढी पाडव्याला संक्रांतीच्या शुभेच्छा

गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना केलेली गडबड अभिनेत्री भूमि पेडणेकर हिच्या चांगलीच अंगलट आली आहे. सोशल मीडियावरुन पाडव्याच्या शुभेच्छा देताना भूमी पेडणेकर हिने चक्क “तिळगूळ घ्या गोड बोला’ म्हटले आहे. गुढी पाडव्याला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा पाहून नेटीझन्सनी तिला चांगलेच ट्रोल केले.

विशेष म्हणजे भूमीने पाडव्यानिमित्त संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. पण, त्यासुद्धा तिला साध्या मराठीत देता आल्या नाहीत. ट्विटरवरुन शुभेच्च्छा देताना तिने ‘तिल गुड घ्या, गोड गोड बोला’ असे हिंदीमीश्रित मराठीचा आधार घेत शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच #HappyGudiPadwa #GoodMorning #marathimulgi #happynewyear असे हॅशटॅगही दिले आहेत. तिने या हॅशटॅगमध्ये “marathimulgi’ हा इंग्लिशमध्ये वापरलेला शब्दप्रयोगही नेटिझन्सना खटकला आहे. त्यावरूनही तिला ट्रोल केले जायला लागले आहे. भूमी पेडणेकर ही पूर्ण मराठी पार्श्वभूमीची आहे. तिचे बालपणही मुंबईत गेले आहे. तिला छान मराठीही बोलता येते. तसेच, तिचे शालेय शिक्षणही जुहू येथील आर्य विद्यामंदिर शाळेत झाल्याचे सांगितले जाते. अलिकडील काळात तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्या टॉयलेट एक प्रेमकथा अशा सुप्रसिद्ध सिनेमाचाही समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.