मुंबई – महानगरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या अँटनी वेस्ट हॅंडलींग सेल कंपनीचा आयपीओ म्हणजे प्राथमिक समभाग विक्री सोमवारपासून सुरू झाली. शेअर बाजारात विक्रीचे वातावरण असूनही पहिल्या काही तासात उपलब्ध शेअरला 1.11 पट मागणी नोंदली गेली.
कंपनीने शेअरची किंमत 313 ते 315 रुपये प्रती शेअर ठरविली आहे. कंपनीला अँकर इन्व्हेस्टर्सकडून अगोदरच 90 कोटी रुपये मिळाले आहेत.
आयपीओच्या माध्यमातून 300 कोटी रुपये उभे करण्यात येणार असून ही रक्कम पिंपरी चिंचवड येथील कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या प्रकल्पात गुंतविली जाणार आहे.
बुधवारी या शेअरची विक्री बंद होणार आहे. या पंधरवाड्यात जारी केलेले बर्गर किंग व मिसेस बेक्टर्स स्पेशॅलीटी फूडचे आयपीओ बरेच यशस्वी झाले आहेत.