नवी दिल्ली – द रिकॉर्डिग अकादमी आयोजित 64व्या ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळा आता पुढे ढकलण्यात आला आहे. हा दिमाखदार सोहळा यंदा 31 जानेवारी रोजी अमेरिकेतील लॉस एंजेलिस मध्ये पार पडणार होता. मात्र, आता करोना रुग्णांची वाढती संख्या आणि ओमिक्रॉनचे नवे वादळ लक्ष्यात घेता हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
संगीत क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा ग्रॅमी अवॉर्ड्स एकूण 26 गटांमध्ये देण्यात येणार असून, प्रत्येक गटातून 10 जणांना नॉमिनेट करण्यात आले आहे. दरम्यान, द रिकॉर्डिग अकादमीने या प्रकरणाबाबत संयुक्त निवेदन जारी केले आहे. आणि त्यानुसार ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता यंदाचा सोहळा आयोजित करण्यात मोठा धोका आहे.
After careful consideration and analysis with city and state officials, health and safety experts, the artist community and our many partners, we have postponed the 64th #GRAMMYs. https://t.co/oMzV1U9Tsc
— Recording Academy / GRAMMYs (@RecordingAcad) January 5, 2022
शहर आणि राज्य अधिकारी, आरोग्य आणि सुरक्षा तज्ञ, कलाकार समुदाय आणि आमच्या अनेक भागीदारांशी झालेल्या चर्चेनंतर, रेकॉर्डिंग अकादमी आणि CBS ने 64वा ग्रॅमी अवॉर्ड शो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही संगीताची आतापर्यंतची सर्वात मोठी रात्र साजरी करण्यास उत्सुक आहोत.
या सोहळ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.’ या आशयाची माहिती द रिकॉर्डिग अकादमीने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वर दिली आहे. गेल्या वर्षीही करोनामुळे हा सोहळा 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता.