#CORONA : घरगुती फेस मास्क वापरा : केंद्र

नवी दिल्ली : घरातून बाहेर पडाल तेंव्हा घरी बनवलेल्या “फेस कव्हर’ने चेहरा झाकून घ्यावा, असे आवाहन केंद्र सरकारने शनिवारी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनेत केले आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर ही सूचना करण्यात आली आहे.

घरात बनवलेल्या अशा फेस मास्कमुळे समाजाचे कोरोनापासून मोठ्या प्रमाणात रक्षण होऊ शकते. काही देशांनी घरगुती बनावटीच्या फेस मास्कच्या वापराचे फायदे विशद केले आहेत, असे या सूचनेत स्पष्ट केले आहे. दरम्यान, शनिवारी देशातील बाधितांची संख्या तीन हजारच्या जवळपास जाऊन पोहोचली. तर बळींची संख्या 68 वर गेली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही लोकांनी बिगर वैद्यकीय मास्क वापरावेत. त्यामुळे वैद्यकीय मास्क कोरोनाशी लढणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या उपयोगी येतील, असे म्हटले आहे. साध्या कापडापासून बनवलेले मास्क वापरावेत. ते ऑनलाईन मागवावेत अथवा घरी बनवावेत, असे आवाहन अमेरिकेच्या साथ नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रानेही केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.