जुन्नर- येथे आज सकाळी साडेदहा ते पावणेबारापर्यंत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीत जुन्नर शहरात निवडणुका शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्त्वाच्या भागांमध्ये आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस स्टेशनकडील जास्तीत जास्त स्टाफ आणि आलेल्या फोर्सचे सोबत संचलन करण्यात आला आले. या संचलनामध्ये 5 अधिकारी, 27 पोलीस, 27 होमगार्ड, सीआयएसएफचे 43 जवान सहभागी झाले होते,
तसेच दुपारी 03ः00 वाजता जुन्नर पोलीस हद्दीतील संवेदनशील गावात म्हणजे कुमशेत, शिरोली बुद्रुक, वडगाव सहानी, सावरगाव, वडज, बुचाकेवाडी, आपटाळे, इंगळुन, पिंपळगाव सिद्धनाथ, कबाडवाडी, गोद्रे या गावांतही निवडणूक पार्श्वभूमीच्या अनुषंगाने संचलन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.