नवी दिल्ली -जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्याचबरोबर भारतीय रुपया वधारत आहेत. त्यामुळे शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घट नोंदली गेली गेली.
दिल्लीत सोन्याचा भाव 205 रुपयांनी वाढून 47,910 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला.
मात्र तयार चांदीचा भाव 61 रुपयांनी वाढून 70,521 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा भाव कमी होऊन 1,891 डॉलर तर चांदीचा भाव 27.67 डॉलर झाला.
याबाबत मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की जागतीक बाजारात सोन्याचा भाव शुक्रवारी कमी झाल्यामुळे भारतीय बाजारातही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.