नवी दिल्ली – जागतिक बाजारातील संकेतानुसार भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरामध्ये घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 154 रुपयांनी कमी होऊन 44,976 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,337 रुपयांनी कोसळून 57,355 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
अमेरिकेच्या कर्जरारोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे आणि चांदीचे दर कमी होऊ लागले आहेत. त्या प्रमाणात भारतीय बाजारातही सोन्याचे दर कमी होत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.