नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याच्या दरात घट होऊनही भारतीय बाजारात मात्र सोन्याच्या दरात माफत वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 32 रुपयांनी वाढून 49,619 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र तयार चांदीचा दर 440 रुपयांनी कमी होऊन 63,474 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,861 डॉलर व चांदीचा दर 23.65 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
या घटनाक्रमाबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटी या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की यूक्रेन मुद्यावरून रशिया आणि अमेरिकेदरम्यान तणाव निर्माण झाला असल्यामुळे जागतिक शेअर आणि धातू बाजारामध्ये कमालीची अस्थिरता आहे. जोपर्यंत युक्रेनमधील परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत बाजारातील अस्थिरता कमी होणार नाही.