नवी दिल्ली – जागतिक बाजारातील संकेतानुसार दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचा भाव तब्बल 158 रुपयांनी वाढून 46,678 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 180 रुपयांनी वाढून 64,210 रुपये प्रति किलो झाला.
यासंदर्भात एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, सध्या डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,794 डॉलर व चांदीचा दर 24.35 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेला. गेल्या एक महिन्यापासून सोन्याचे दर कमी पातळीवर स्थिरावले आहेत. त्यामुळे आगामी काळात सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.