नवी दिल्ली – गेल्या काही दिवसात जागतिक चलन बाजारात डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. भारतीय सराफातही सोमवारी सोन्याचा दर 170 रुपयांनी वाढून 50,926 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 458 रुपयांनी वाढून 61,792 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,857 डॉलर व चांदीचा दर 21.99 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. यासंदर्भात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की युध्द संपत नाही तोपर्यंत सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता आहे.