नवी दिल्ली – सोन्यासह जगातील विविध बाजारामध्ये कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. दिल्ली सराफात सोन्याचा दर 76 रुपयांनी वाढून 50,027 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
मात्र तयार चांदीचा दर 710 रुपयांनी कमी होऊन 60,224 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात मात्र सोन्याचा दर कमी होऊन 1,812 डॉलर व चांदीचा दर 21.33 डॉलर प्रति औंस या पातळीवर राहिला.