नवी दिल्ली- जागतिक संकेतानुसार भारतीय बाजारात शुक्रवारी सोन्याचा दर 293 रुपयानी कमी होऊन 49,970 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 1,075 रुपयांनी कमी होऊन 54,326 रुपये प्रति किलो झाला.
या संबंधात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकन रोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक इतरत्र वळत आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी होत असल्याचे दिसून आले.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,703 डॉलर व चांदीचा दर 18.20 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. आगामी काळात युद्ध आणि इतर कारणामुळे सोने व चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.