Gold-Silver Price : जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने राष्ट्रीय राजधानी दिल्लीत शुक्रवारी सोन्याचा भाव 130 रुपयांनी वाढून 63,280 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, असे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे. दुसरीकडे चांदीचे दर 300 रुपयांनी घसरून 76,000 रुपये प्रतिकिलोवर आली.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, दिल्लीच्या बाजारात सोन्याच्या किमती रु. 63,280 प्रती 10 ग्रॅमवर व्यवहार झाले, जे विदेशी बाजारातील संकेतानुसार रु. 130 वर आहेत.
दरम्यान, फ्युचर्स ट्रेडमध्ये, एमसीएक्सवर सोन्याचा फेब्रुवारीचा करार ५४१ रुपयांनी वाढून ६२,३२९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तसेच, एक्सचेंजमध्ये चांदी 695 रुपयांनी वाढून 72,049 रुपये प्रति किलो झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2,038 डॉलर प्रति औंस, तर चांदी प्रति औंस 22.92 डॉलरवर घसरली. जागतिक भू-राजकीय अनिश्चिततेत वाढ होत असताना सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोन्याची मागणी गुंतवणूकदारांमध्ये वाढली आहे, असेही गांधी म्हणाले.
एचडीएफसी लाइफचा नफा 365 कोटींवर
एचडीएफसी लाईफने शुक्रवारी डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 16 टक्क्यांनी वाढ नोंदवून ती 365 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. खासगी क्षेत्रातील विमा कंपनीचा नफा वर्षभरापूर्वी 315 कोटी रुपये होता.
तथापि, 31 डिसेंबर 2022 रोजी कंपनीचे सॉल्व्हेंसी रेशो 209 टक्क्यांवरून 190 टक्क्यांवर घसरले. डिसेंबरअखेर संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने एकूण 1,157 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.