नवी दिल्ली – जागतीक बाजारात दर घसरल्यामुळे भारतात सोन्याचे दर ( gold price today ) सोमवारी 104 रुपयांनी कमी होऊन 48,703 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले.
त्याचबरोबर दिल्ली सराफात तयार चांदीचे दर 736 रुपयांनी कमी होऊन प्रति किलोला 62,621 रुपये झाले.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की डॉलर बळकट झाल्यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्याचा भारतातील दरावरही परिणाम झाला.