नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे दिल्ली सराफात सोन्याचा दर 415 रुपयांनी वाढून 48,327 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 858 रुपयांनी वाढून 64,429 रुपये प्रति किलो झाला. काल चांदीचा दर 1,300 रुपयांनी वाढला होता. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,841 डॉलर व चांदीचा दर 24.13 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे.
महागाई वाढत असल्यामुळे रिझर्व्ह बॅंका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढून सोन्याचा दर वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.