मुंबई – धातू क्षेत्राच्या कंपन्या चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. टाटा स्टील कंपनीच्या शेअर्सचा भाव सध्या 1,229 रुपये प्रति शेअर आहे. भविष्यात हा शेअर 1,325 रुपयापर्यंत वाढू शकतो असे आयसीआयसीआय डायरेक्ट या ब्रोकरेज संस्थेला वाटते. 1917 मध्ये स्थापन झालेली टाटा स्टील कंपनी लार्ज कॅप कंपनी असून या कंपनीचे बाजार मूल्य 1,48,246 कोटी रुपये आहे. बाजारातील अस्थिरता वाढत असली तरी निफ्टी 17,600 या पातळीच्या खाली घसरणार नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी बचावात्मक धोरण स्विकारची गरज असल्याचे काही विश्लेषकांनी सूचीत केले.