टेलीव्हिजन पासून बॉलीवूडपर्यत अभिनेत्री मौनी रॉयने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. मौनी सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.
अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यात तिच्या ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत. या फोटोवरून मौनी रॉय गार्डनमध्ये फोटोशूट करत असल्याचे दिसून येते.
व्हाईट कलरच्या आउटफिटमध्ये मौनी रॉय खूपच स्टायलीश आणि तिचा अंदाज एकदम हटके असल्याचा दिसून येत आहे. यात मनमोहक अशा फुलांसोबत ती फोटो काढताना दिसते.
तसेच गॉर्डनमध्ये पुस्तक वाचत असताना ती पोज देताना झळकते. मौनी रॉयचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर लाखोंच्या संख्येने कमेंट येत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली की, तू फुलांपेक्षाही खूपच मोहक दिसत आहे. तुझे सौंदर्य पाहतच बसावे असे वाटते.
अभिनेत्रीच्या या फोटोंना बॉलीवूड आणि टीव्ही क्षेत्रातील कलाकारांनीही लाइक केले आहे. दरम्यान, मौनी रॉयने 2007 मध्ये एकता कपूरच्या “क्योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेतून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर अक्षय कुमारसोबत “गोल्ड’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते.