पुणे, दि. 11 -दिवाळीनिमित्त घरोघरी साफसफाई केली जाते. अशावेळी जुन्या, परंतु उपयुक्त वस्तू पर्यावरणपूरक पद्धतीने फेरवापर आणि फेरनिर्मितीसाठी देता याव्यात, यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यासाठी यंदाही “व्ही कलेक्ट मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 16 ऑक्टोबरपर्यंत शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर फिरत्या वाहनांमधून हे कचरा संकलन केले जाणार आहे.
नागरिकांनी या टाकाऊ वस्तू जमा करावा, असे आवाहन महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे. अनेकदा नागरिक रात्रीच्यावेळी तो गुपचूपपणे नदीपात्र, नाले, तसेच रस्त्याकडेला टाकतात. तर, सणांच्या कालावधीत निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण लक्षणीय असते. त्यामुळे महापालिकेने यंदाही या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमात जुन्या वस्तूंचे संकलन करून त्या कचऱ्यात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. फेरवापर आणि फेर चक्रीकरणाकडे वळवल्या होत्या. त्यामुळे जुने कपडे, पुस्तके, भांडी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शोभेच्या वस्तू कचरा वेचक व इतर गरजू लोकांपर्यंत अतिशय स्वस्त दरात पोहचवण्यात मोठे यश मिळाले आहे.
ऑनलाइन मिळेल माहिती : महापालिकेच्या http://ww.pmc.gov.in/collect-drive 2022 या संकेतस्थळावर या केंद्राची यादी नागरिकांना पाहता येणार आहे.
कोणत्या भागात कधी देऊ शकता कचरा
दि. 12 ऑक्टोबर – ढोले पाटील रस्ता, शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय
दि. 13 ऑक्टोबर – वाघोली, नगर रस्ता, येरवडा – कळस धानोरी
दि. 14 ऑक्टोबर – कोथरूड-बावधन, वारजे-कर्वेनगर
दि. 15 ऑक्टोबर – औंध-बाणेर, बिबवेवाडी, कोंढवा-येवलेवाडी, हडपसर मुंढवा
दि. 16 ऑक्टोबर – सिंहगड रस्ता, वानवडी-रामटेकडी, कसबा विश्रामबागवाडा, धनकवडी-सहकारनगर