मुंबई – बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणून रितेश- जिनिलियाला ओळखले जाते. या दोघांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. नुकतेच ‘वेड’ या चित्रपटात त्या दोघांनी काम केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता रितेश- जिनिलियाची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा सुरू झाली आहे. सध्या सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावरून जिनिलिया तिसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा होत आहे.
मुंबईमध्ये एका फॅशनस्टोरच्या उद्घाटनासाठी रितेश- जिनिलिया आले होते. त्यावेळी पापाराझींसमोर पोज देत दोघांनी फोटोशूट केले. फॅशनस्टोरच्या उद्घाटनासाठी जिनिलियाने जांभळ्या रंगाचा वनपीस तर रितेशने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि आकाशी रंगाची पँट परिधान केली आहे. यावेळी फोटोसाठी पोज देताना, जिनिलिया तिच्या पोटावर हात ठेवताना दिसली. अभिनेत्रीच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा होत आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी देखील ‘जिनिलिया पुन्हा प्रेग्नेंट आहे का?’, ‘जिनिलियाकडे गुड न्यूज आहे का?’, असा सवाल केले आहेत. तर काहींनी देशाच्या वाढत्या लोकसंख्येवरुन दोघांना ट्रोल केले आहे. मात्र जिनिलिया खरचं प्रेग्नेंट आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. व्हायरल व्हिडिओवरून चाहत्यांनी जिनिलिया गरोदर असल्याचा अंदाज लावण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, 2 फेब्रुवारी 2012 रोजी रितेश आणि जिनिलियाचे लग्न झाले. 2014 मध्ये त्यांना मुलगा झाला त्याचे नाव रियान असे आहे. त्यानंतर 2016 मध्ये जिनिलिया दुसऱ्यांदा आई झाली.