मुंबई – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात.
दरम्यान, आपल्या लावणीमुळे धुमाकूळ घालत संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. कारण गौतमी पाटीलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. गौतमी पाटील अश्लील डान्स करीत असल्याचा आरोप केला आहे. प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील हीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.
गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. ‘गौतमी पाटील तिच्या डान्समधून अश्लीलता पसरवतेय आहे’ आणि त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांवर कायमस्वरुपी बंदी घालण्याची मागणी होत आहे. दुसरीकडे लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी गौतमीच्या ह्याच लावणी कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.