देहूगाव – तीर्थक्षेत्र देहूत करोनाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात गत आठवड्यांपासून झाली आहे. या आठवड्यात देहूत 34 बाधीत नवीन रुग्ण आढळून आले आहे. पैकी गाथा मंदिरातील 14 जणांचा शनिवारी (दि. 6) पॉझिटिव्ह अहवाल आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गाथा मंदिर भाविकांसाठी दर्शनार्थ बंद करण्यात आले आहे.
करोना दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्या नंतरही नागरिक गर्दी करत, विना मास्क बिनधास्त फिरत आहेत. करोना बाधित रुग्णांची संख्या राज्यात दिवसेंदिवस वाढू लागली आहे. नागरिकांनी स्वतः खबरदारी घेतली पाहिजे, अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, डॉ. रणजित कांबळे यांनी दिली आहे.
या आठवड्यात माळवाडी, विठ्ठलवाडी, देहू, माळवाडी, चव्हाणनगर, देहू, गाथा मंदिर परिसरात करोना बाधित रुग्ण आढळले.