करोना रुग्णसंख्या वाढीत महाराष्ट्र देशात आघाडीवर; आढळले ‘एवढे’ रुग्ण

नवी दिल्ली  – देशातील महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये दैनंदिन पातळीवर नव्या कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होण्याचा कल कायम आहे. गेल्या 24 तासांत, 18,599 नव्या कोविड ग्रस्तांची नोंद झाली. महाराष्ट्रात दैनंदिन पातळीवरील सर्वाधिक म्हणजे 11,141 रुग्णांची नोंद झाली असून त्यापाठोपाठ केरळमध्ये 2,100 तर पंजाब मध्ये 1,043 नवे रुग्ण सापडले.

जास्त सक्रीय कोविड रुग्ण असणाऱ्या आणि रोज नोंदल्या जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असलेल्या महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमध्ये कोविड – 19 चे नियंत्रण आणि व्यवस्थापनांच्या उपाययोजनांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी नुकतेच केंद्र सरकारने एक उच्च स्तरीय पथक पाठविले होते. ही पथके, या राज्यांमधील अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्यापुढील समस्या आणि आव्हानांचे गंभीर्य जाणून घेत आहेत.
देशातील 8 राज्यांमध्ये कोविड रुग्णांच्या दैनंदिन संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे. देशातील एकूण सक्रीय रुग्णांची संख्या आज 1,88,747 वर पोहोचली. देशात आतापर्यंत झालेल्या कोविड चाचण्यांनी 22 कोटींचा आकडा पार केला आहे.

गेल्या 24 तासांत 97 रुग्ण कोविडमुळे मृत्युमुखी पडले. या नव्या मृत्यूंपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 38 तर पंजाबमध्ये 17 आणि केरळमध्ये 13 रुग्णांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.