पुणे – करोना पार्श्वभूमीवर गेली आठ महिने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्व उद्याने बंद होती. मात्र, नुकत्याच झालेल्या बैठकीत ती खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला.
लष्कर परिसरात सुमारे तेरा उद्याने आहेत. यापैकी बहुतांश उद्यानांमध्ये नागरिक मॉर्निंग वॉक, व्यायामासाठी जातात.
काही उद्यानांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी खुल्या व्यायामशाळादेखील सुरू करण्यात आल्या आहेत. आठ महिन्यांनंतर उद्याने खुली झाल्याने नागरिकांना सकाळी फिरायला जाण्याचा आनंदही घेता येऊ लागला आहे.
ही उद्याने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत, असे बोर्ड प्रशासनातर्फे कळविण्यात आले.