प्रभातच्या नगर आवृत्ती व्यवस्थापकपदी गणेश विलायते रुजू

नगर  – दैनिक प्रभातच्या नगर आवृत्तीच्या शाखा व्यवस्थापकपदाची सूत्रे गणेश विलायते यांनी आज स्वीकारली. वृत्तसंपादक जयंत कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रभातचे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, सीए रवी इंडी, वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, कोपरगाव तालुका प्रतिनिधी शंकर दुपारगुडे उपस्थित होते.

गणेश विलायते हे वृत्तपत्र क्षेत्रात मागील 20 वर्षांपासून कार्यरत आहेत. दैनिक लोकमतच्या नगर आवृत्तीत जाहिरात प्रतिनिधी म्हणून त्यांनी कामास प्रारंभ केला. त्यानंतर दैनिक पुढारीची नगर आवृत्ती सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. तद्‌नंतर सांगली येथे लोकमत, मुंबई येथे सकाळमध्ये जाहिरात व्यवस्थापक म्हणून काम केले.

पुढारी, पुण्यनगरीच्या नगर आवृत्त्यांमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. पुणे पुढारीच्या जिल्हा आवृत्तीत वरिष्ठ जाहिरात व्यवस्थापक पदावर प्रदीर्घकाळ काम करून त्यांनी तेथे आपल्या कामाचा ठसा उमटवला. जाहिरातदार, वार्ताहर, एजंट यांच्याशी अतिशय सलोख्याचे संबंध निर्माण करण्यात त्यांची हातोटी आहे. यावेळी गणेश विलायते यांनी प्रभात नगर आवृत्तीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आगामी काळात कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.